जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने 1 एप्रिल पासून मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स 

लांजा (प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, (रत्नागिरी विभाग) च्या वतीने 1 एप्रिल पासून लांजा केंद्रामध्ये मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करण्यात येणार आहेत.

जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिम्मित लांजा केंद्रामध्ये मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करण्यात येत आहेत.कोर्स मध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन (Registration) करणे गरजेचे आहे. नोंदणी करता खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्येक्ष येऊन भेटणे गरजेचे आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र – बँक ऑफ इंडिया, खरेदी विक्री संघ लांजा.

नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/XjXTvMT9AxThe6bB6 हा गुगल फॉर्म भरणे अनिर्वाय आहे. अधिक माहितीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था लांजा चे तालुका प्रमुख योगेश पांचाळ – ८९९९६६३०७९ यांचेशी संपर्क साधावायचा आहे.