शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुणाल कामराचा पुतळा मालवणात जाळला

मालवण | प्रतिनिधी : शिवसेनेचे मुख्य नेते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिपणी आणि बदनामी करणाऱ्या कुणाल कामरा याचा मालवण शिवसेनेने निषेध नोंदवत प्रतिकात्मक पुतळा जाळला.

मालवण भरड नाका येथे जोरदार घोषणा देत कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. आमच्या नेत्यांवर आणि पक्षावर कोण असे कृत्य करत असेल तर जशास तसे सडेतोड उत्तर दिले जाईल असे यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी ठणकावले.

यावेळी शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, महेश कांदळगांवकर, राजा गांवकर, बाळू नाटेकर, निलम शिंदे, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर, प्रितम गावडे, पराग खोत, संकेत राऊळ, तोडणकर, खवणेकर, संदीप भोजणे, अंजना सामंत, ऋषिकेश सामंत यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.