राजापूर (प्रतिनिधी): बुधवारी रात्री राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापुरातही बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ विजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र ऐन हापूसच्या हंगामात अवकाळी पाऊस पडल्याने आंबा बागायतदार धास्तावला आहे.
गेले काही दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. कोकणात तर अनेक भागात ३८ ते ३९ इतके टेंपरेचर गेले आहे. बुधवारी रात्री राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्हयात मोठया प्रमाणावर पाऊस पडला. यात मोठया प्रमाणावर नुकसानही झाले. रत्नागिरी जिल्हयातही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला.
राजापुरातही बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठाही काही काळ खंडीत झाला होता. मात्र या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मात्र धास्तावले आहे. हापूस आंबा हंगाम तेजीत असताना अवकाळी पाऊस झाल्याने आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. बुधवारी रात्री अवकाळी पाऊस झाल्यानंतर गुरूवारी तापमानात वाढ झाली होती.











