खेड(प्रतिनिधी)
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत चालला असून यामुळे वणवा लागण्याच्या घटना देखील वाढत आहेत गुरुवारी दुपारच्या ३ वा च्या सुमारास घाटामधील डोंगरावर अचानक वणवा लागल्याने महामार्गावर धुराचे लोट उठल्याने मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहने हाकताना अडथळा निर्माण झाला होता.
भोस्ते घाट मध्ये अपघाताची मालिका सुरूच असून त्यात वणव्याने अचानक पेट घेऊन निर्माण झालेल्या धुराने मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती त्यात दुपारच्या सुमारास वारे देखील वेगाने वाहत असल्याने वणव्याने आणखी पेट घेतला होता.











