जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेचेही आयोजन
.ओटवणे (प्रतिनिधी ) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सती देवी मंदिर ओटवणे मांडवफातर वाडी येथे हिंदू नववर्षाच्या औचित्यावर म्हणजे गुढी पाढव्यादिनी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवारी 30 व सोमवार 31 मार्च रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी स. 11 वा. श्री सत्यनारायण महापूजेने या कार्यक्रमाला प्रारंभ होईल 1.30 वा. श्रींची आरती 2 वा महाप्रसाद, 5ते 6.30 मुलांची भजने, 6.30 वा. शतदीप सोहळा, 6.45 ते 8 सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. 8 ते 9 ग्रामस्थांचे भजन रात्रौ 9 ते 10.30 दिंडी ( कोकण दर्शन ), खास आकर्षण आई माऊली महिला ढोल पथक चेदवन तर रात्रौ 11 वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत ट्रिक सिन युक्त नाट्य प्रयोग पतिव्रत्य तेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी भजन प्रेमिंसाठी खास भजनाची मेजवानी असणार आहे.जिल्हास्थरीय नवोदित बुवांची भजन स्पर्धा ठीक 5.30 वाजता सुरु होईल या भजन स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होईल तर श्री.स्वामी माऊली प्रासादिक भजन मंडळ विलवडे या मंडळाच्या भजनाने भजन स्पर्धेला प्रारंभ होईल यानंतर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ निरवडे, सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ माजगाव, स्वामी समर्थ शेर्ले, दत्तकृपा वायंगणी वेंगुर्ला, रवळनाथ नवतरुण ओटवणे, ब्राह्मण प्रासादिक भ. मंडळ माळेवाड, कालिका प्रा. भ. मंडळ कारिवडे या भजन मंडळा मध्ये भजन स्पर्धा रंगणार आहे या दोन दिवशीय कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन सती देवी कला क्रीडा मंडळ आणि मांडवफातर वाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







