सावंतवाडी । प्रतिनिधी : न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची शिवसेनेच्या सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना त्याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गुरुनाथ सावंत, राज धवण, नवनाथ पार्सेकर, विठ्ठल परब, तुकाराम पार्सेकर,अमोल पार्सेकर यांच्यासह न्हावेली गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर शिवसेनेच्या विविध आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी अक्षय पार्सेकर यांचे अभिनंदन केले. या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना अक्षय पार्सेकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आणि पक्ष संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्षय पार्सेकर यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असे यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले.












