प्रतिनिधी l पाली :तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील विद्यार्थी दिक्षा महेंद्र मेस्त्री,आरोही संतोष सावंत,
सत्वशील सहदेव गुरव या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या ऐकाच शाळेतील तीन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्र सरकारच्या जिल्हा नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ या शाळेतील ऐकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून त्यांच्या या यशामागे प्रशालेतील प्रमुख मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे व मुख्याध्यापक डॉ.जनार्दन मोहिते,शिक्षक ममता सावंत,श्रद्धा रसाळ,नेहा जाधव,श्रुती वारंग यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत,आमदार किरण सामंत,रत्नागिरी तालुका गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.दत्तात्रय सोपनूर,केंद्रप्रमुख विष्णु पवार,शिवसेना पाली जि.प.गटाचे विभागप्रमुख सचिन सावंत, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे,मा. सरपंच संदीप गराटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे,गणेश चव्हाण,अमेय वेल्हाळ, अॅड.सागर पाखरे,श्रीकांत राऊत यांनी अभिनंदन केले आहे.










