वेतोरे हायस्कूल ची विद्यार्थीनी कु. चैतन्या गवळी एनएमएमएस परीक्षेत सिंधुदुर्गात दुसरी

वेंगुर्ले l प्रतिनिधी :श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे ता. वेंगुर्लेची इयत्ता ८ वी मधील विद्यार्थीनी कु.चैतन्या किशोर गवळी एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यामध्ये दुसरी आली आहे.

सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात दिनांक २२/१२/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस)परीक्षेची गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेची विद्यार्थीनी कु.चैतन्या किशोर गवळी हिने एन टी ब या प्रवर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. तिला प्रत्येक महिन्याला रूपये १०००/-प्रमाणे इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत ४८०००/-रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

तिच्या या उज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे कार्याध्यक्ष श्री. दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष श्री.सुर्याजी नाईक, कार्यवाह श्री.प्रभाकर नाईक सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर, प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.