कणकवली – कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्या वतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी १५ दिवसीय मोफत योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची १ एप्रिल रोजी सांगता करण्यात आली. समारोप कार्यक्रमावेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढे देखील योग चालू ठेवण्याचा निर्धार केला. अश्या प्रकारची नावीन्यपूर्ण प्रशिषण घेऊन त्यात सहभागी करून घेतल्याबद्दल कणकवली नगरपंचायतचे आभार देखील सहभागी महिलांनी मानले आहेत.
यावेळी योग्य प्रशिक्षण कार्यशाळेस योग प्रशिक्षक म्हणून आनंद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. योग हा मानवी जीवनातील निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असून नेहमीत योग केल्यास व्याधी मुक्त, उत्साही जीवन जगता येत याचा अनुभव १५ दिवशीय योग प्रशिक्षणात उपस्थित महिलांनी घेतला. भविष्यातही अश्या प्रकारची नावीन्य पूर्ण व उपयुक्त प्रशिषणाचे आयोजन करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात १८ वर्ष वयापासून ७० वर्ष पर्यंतच्या सर्व वयोगटातील महिलांनी उस्फुर्त सहभाग घेत जीवनात योग किती आवश्यक आहे समजून घेतले. या १५ दिवसाच्या योग प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या ६० वर्षावरील ०६ महिलांना कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. तसेच सहभागी झालेल्या सर्व महिलांना कणकवली नगरपंचायतीच्यावतीने १५ दिवसीय योग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
या योग प्रशिक्षणाच्या समारोप वेळी कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील, योग प्रशिक्षक आनंद सावंत, सहा. प्रकल्प अधिकरी अमोल भोगले, प्रशासकीय अधिकारी, अमोल अघम, ध्वजा उचले, निकिता पाटकर, अस्मिता चव्हाण, ज्योती देऊलकर व रूचीता ताम्हणकर इत्यादी उपस्थित होते.










