वेंगुर्ले | दाजी नाईक : देशभरात श्री राम जन्मसोहळा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच वेंगुर्ले येथील सुमारे २०० वर्षापूर्वीच्या जुन्या पुरातन राम मंदिरात आजही परंपरेनुसार श्रीराम जन्म सोहळा संपन्न झाला. अश्याच पद्धतीने श्री राम जन्म सोहळ्याचा उत्साह वेंगुर्ले तालुक्यातील इतर राम मंदिर व अन्य मंदिरातही पहावयाला मिळाला.
वेंगुर्ले मद्ये मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात राम मंदिर व मारुती मंदिर आहेत. दरम्यान या मंदिरात सकाळी पुरोहीता करवी श्रीरामाची पूजा केल्यानंतर कीर्तन व त्यानंतर राम जन्म सोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. श्री प्रभू रामाचे पाळणा गीत महिलांनी गात प्रभू रामाचा जन्म सोहळा आनंदात साजरा केला. दिवसभर मंदिरात राम जन्म सोहळा निमित्त राम रक्षा, राम गीत, राम जन्म घोष असे विविध कार्यक्रमांनी जन्म सोहळा संपन्न होत आहे. वेंगुर्ले शहरातील श्री.देव रामेश्वर मंदिरातही राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.












