खेड (प्रतिनिधी)
महामार्गावरील कळंबणी-बौद्धवाडी येथे दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांतता भंग केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात शैलेश प्रकाश कदम (३५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबत पोलीस कॉन्स्टेबल रमेश बांगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. संशयित दारुच्या नशेत आरडाओरडा करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचून प्रत्यक्ष पाहणी केली असता शांतता भंग केल्याचे निदर्शनास आले.











