कुणकेश्वर मंदिर येथे १० एप्रिल पासून “कोकण ध्यान शिबिराचे” आयोजन

कणकवली
श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने ध्यान ज्ञान फाउंडेशन आणि ब्रह्मानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन 10 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता कुणकेश्वर मंदिर येथे होणार आहे.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आंबा बागायतदार व उद्योजक अरविंद वाळके अजय नानेरकर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम तेली डॉक्टर रामदास बोरकर आदी उपस्थित राहणार आहेत सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत शिबिराचे उद्घाटन श्री शेत्र कुणकेश्वर मंदिर येथे होणार आहे 10, 11, 12 एप्रिल असे तीन दिवस हे शिबिर चालणार आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांनी केले आहे.