रत्नागिरी शहरात पोलसांची अमली पदार्थविरोधी तिसरी कारवाई 

प्रशांत नगर येथून पकडला सव्वा तीन लाखांचा साडेपाच किलो गांजा

रत्नागिरी ः प्रतिनिधी 

शहरातील प्रशांत नगर येथील साईभूमी नगर बिल्डिंगच्या मागे 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा तब्बल 3 लाख 25 हजारांच्या गांजा सदृश्य अमली पदार्थासह शहर पोलिसांनी सांगलीतील एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7.15 वा. सुमारास करण्यात आली.

मन्सूर अली निजाम पठाण (41,रा.देशपांडे डेअरी शिवाजी रोड मिरज,सांगली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार भालचंद्र दिलीप मयेकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी शहर पोलिस प्रशांतनगर येथे गस्त घालत असताना त्यांना एकजण संशयित हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्याची चौकशी व झडती केल्यावर त्याच्याकडून 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली सदृश्य पदार्थ मिळून आला. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट कलम 8 (क),20 (ब),(2)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर करत आहेत.