रत्नागिरी : देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवसानिमित्त देवरुख येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी देवरुख येथे येत आहेत.
ना. नितेश राणे गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एमएसपीएम कॉलेज, कणकवली येथे आगमन व हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता कोसुंब, ता. संगमेश्वर येथे त्यांचे आगमन होऊन ते देवरुखकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वाजता मराठा भवन सभागृह, देवरुख येथे खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. तेथे ना. राणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते दुपारी 12 वाजता कांजीवारा, देवरुख येथे खा. नारायण राणे यांच्यासह राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी 12.15 वाजता मोटारीने कोसुंब हेलिपॅड, संगमेश्वरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता कोसुंब हेलिपॅड, संगमेश्वर येथून हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गकडे प्रयाण करतील.











