“तुम्ही टीका करत राहा मी कामातून उत्तर देत राहीन”

टीकाकारांचा समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

रत्नागिरी | प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आजवर झालेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर अत्यंत शांतपणे दिले आहे. त्याचा प्रत्यय आज त्यांच्या रत्नागिरी दौर्यामध्ये सुद्धा आला. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांवर उबाठा संघटनेकडून असंसदीय भाषेत टीका केली जात आहे. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. त्याला आज मुख्यमंत्री प्रत्युत्तर देतील असे वाटत होते.

मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील आरोपणा उत्तर देताना सुद्धा त्यांना आरोप करत राहूदे, त्याला मी काम करून उत्तर देईल अशी भूमिका घेतली. मात्र असे असले तरीही त्यांच्या भाषणातून मागच्या फेसबुक सरकारच्या कारभारावर टीका झाली. उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यावरही टीका करताना काहींचे गळ्यातले पट्टे निघालेत काहीना आता जालीम काढा दिला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.