महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
चिपळूण (प्रतिनिधी):— महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा चिपळूणने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा – सन्मान स्त्री शक्तीचा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून साड्यांची महाराणी पैठणी मिळविण्याचा मान चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावच्या सौ.रिया राकेश सुर्वे यांनी मिळविला. त्यांना मानाची पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सौ.पूजा राठोड तृतीय क्रमांक सौ.प्रज्ञा विनोद गमरे चतुर्थ क्रमांक सौ.वैदेही वारंग आणि उत्तेजनार्थ सौ.वैभवी खेडेकर यांनी पटकाविला. या सर्व विजेत्या महिला भगिनींना साडी आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी इतर महिलांनी ही विविध खेळांच्या माध्यमातून बक्षीसे मिळविण्याचा मान पटकाविला.
भाजपा स्थापना दिन सप्ताह आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिपळूण शहराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला भगिनींच्या रोजच्या संसारिक जीवनामध्ये त्यांचे मनोरंजन होण्याकरिता दि. १० एप्रिल रोजी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणामध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला चिपळूण शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. या कार्यक्रमाला ४५० हुन अधिक महिला उपस्थित होत्या. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेमध्ये उपस्थित महिलांपैकी जवळपास १५० हून अधिक महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला होम मिनिस्टर स्पर्धेचे निवेदन करण्यासाठी चला हवा येऊ द्या फेम, उत्कृष्ट निवेदक ऋषभ आकीवाटे खास उपस्थित होते. त्यांनी होम मिनिस्टर स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेल्या सर्व खेळांमध्ये उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे मुख्य नियोजन भाजपा चिपळूण शहर चिटणीस सौ.प्रणाली सावर्डेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते.
यावेळी भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्षा तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजा निकम, डॉ.विनिता नातू, सौ. सीमा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा अदिती देशपांडे, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.प्राजक्ता टकले, राणी महाडिक,भाजपा शहर सरचिटणीस सारिका भावे, शहर चिटणीस प्रणाली सावर्डेकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष शितल रानडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अनिता राजेशिर्के, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, माजी शहराध्यक्ष वैशाली निमकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अश्विनी वरवडेकर, पुनम काजारी, निकिता रतावा, सोनल कारेकर, सपना भिसे, विमल लढ्ढा, श्रद्धा कदम, स्वाती पटवर्धन, जया केतकर,अमृता जोशी, मृणाल घटे, मनाली जाधव, रविना गुजर, राणी महाडिक, आरती महाडिक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, विजय चितळे, सहकार सेलचे जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, शहर सरचिटणीस विनायक वरवडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, विनोद भॊबस्कर, अविनाश सावर्डेकर, अभिजीत सावर्डेकर, निनाद आवटे, अनिल सावर्डेकर, विवेक गोखले, गणेश हळदे, प्रफुल्ल पिसे, शुभम पिसे, कुणाल आंबेकर, चेतन मालशे,महेश कांबळी, प्रणय वाडकर, निखिल रतावा, अभिषेक जागुष्टे,स्वानंद रानडे, जतीन घटे, मंदार कदम,दर्शन चव्हाण ,दीपक चव्हाण आदींनी मोलाचे सहकार्य केले.











