अंमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

सावंतवाडी : मुबारक ईस्माईल खतीब, रा. कोल्हापूर व सलीम शरफुद्दीन कापडी, रा. मलकापुर यांचेविरूध्द अंमली पदार्थ जवळ बाळगला म्हणून सावंतवाडी पोलीसांनी एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २७ अन्वये फिर्याद दाखल करून त्यानुसार मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, सावंतवाडी यांचे कोर्टात स. केस नंबर १८/२०२१ खटला चालला. सदर केसच्याकामी सरकारपक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. याकामी आरोपींतर्फे विधिज्ञांनी सदर प्रकरणी एन.डी.पी.एस. कायदयातील महत्वाच्या तरतुदींची पुर्तता न करता तपास काम केले असा युक्तीवाद केला तसेच साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपास कामातील विसंगती या बाबी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या. याकामी आरोपींच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद मे कोर्टाने ग्राहय धरून आरोपींची २६ मे रोजी न्यायनिर्णय देवून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याकामी आरोपींतर्फे ॲड. परीमल गजानन नाईक, ॲड. संदीप संभाजीराव निंबाळकर, ॲड. रविंद्र महादेव कंग्राळकर व ॲड. सर्वेश सहदेव कोठावळे यांनी काम पाहीले.