सावंतवाडी : तालुक्यातील मळगांव
जोशी – मांजरेकरवाडी येथील रहिवासी गोविंद सहदेव जोशी (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सर्पदंश झाल्याने त्यांना प्रथम सावंतवाडीत व त्यानंतर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मूलगी, भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी कंझ्युमर्सचे कर्मचारी श्यामसुंदर जोशी यांचे ते वडील होत.













