खेड(प्रतिनिधी) तालुका आरोग्य विभागामार्फत तालुक्यात राबवण्यात आलेल्या संक्रिय क्षयरोग शोधमोहिमेदरम्यान ६ क्षयरोग रुग्ण आढळले. घाणेखुंट-गवळीवाडी येथे ३ रुग्ण • सापडले. सर्वेक्षणदरम्यान २२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्तसाठी पात्र ठरल्या आहेत. ८०. संशयिते रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश. खरटमोल यांनी दिली. तालुक्यात क्षयरोग निर्मूलनासाठी त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विशेष उपक्रमही • राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
तालुका आरोग्य विभागामार्फत क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्यावर भर देण्यात आला आहे. त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून ६ रुग्ण क्षयरोगी आढळले. लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या घाणेखुंट-गवळीवाडी येथे ३ रुग्ण आढळले असून या मागची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. वावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या कुरवळजावळीत १, धामणंद राजवाडा येथे १ तर तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गतच्या चिंचवली येथे १ रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांवर उपचार कान त्यांना क्षयरोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय अन्य ८० संशयित रुग्णांवरही उपचार सुरू असल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायती हद्दीतील १६,५२० इतकी लोकसंख्या असून हे सर्वजण क्षयरोगमुक्त असल्याची बाब सक्रिय शोधमोहिमेत समोर आली. क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतीमध्ये उधळे बुद्रुक (लोकसंख्या १४८), कटेल (२३५), चिंचवली (१,२०४) दिवाणखवटी (२२४) घेरारसाळगड (७०८), जैतापूर (६९९), तळे (७९३) तुळशी खुर्द (८५५), भिलारे आयनी (९२७), धामणी (१९९३). सवणस खुर्द (१,२८०), मुंबके (२००), शिर्शी (२०३) बोरज दाभी ळ (५० असगणी (५९९), तळवटपाल (९४३), केळणे (५०५), गुणदे (१,४८०), धामणदेवी (७७५) मुरडे (३११), माणी (९६३) यांचा समावेश आहे.









