विश्व हिंदू परिषदेचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

केंद्रीय महामंत्री बजरंग बागडा यांची उपस्थिती 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ व्या जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर याविषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले.यावेळी विश्व हिंदू परिषद विभागमंत्री विवेक वैद्य,जिल्हा सहमंत्री दिपकजी जोशी,सामाजिक समरसता प्रमुख संदेश टिळेकर मातॄशक्ती प्रमुख सौ.अस्मिता सरदेसाई, प्रसाद दामले, विशाल पटेल इत्यादी उपस्थित होते.