कोकण रेल्वे मार्गावरील विस्टाडोम कोच ने ६ महिन्यात केली ८.४२ करोड़ रुपयांची कमाई

Vistadome coaches on Konkan Railway route earned Rs 8.42 crore in 6 months

देवेंद्र जाधव | खेड : कोकणची हिरवीगार वनराई, उत्तुंग पर्वतरांगा, फेसाळणारे धबधबे, नद्या-नाले,नारळी-पोफळीच्या बागा, त्यातून दिसणारी टुमदार कौलारु घरे अन् त्यातूनच जाणारा कोकण रेल्वे मार्ग असे काहीसे निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जाणारा कोकण रेल्वे मार्गाचा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीतच जाण्यासारखा आहे. परंतु हाच प्रवास द्विगुणीत होण्यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यां मध्ये बसवण्यात आलेल्या काचेचे ‘पॅनलयुक्त असलेले व्हिस्टाडोम कोच ने नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्या च्या कालावधी मध्ये ६६ हजार प्रवाशांनी केलेल्या प्रवासा मुळे ८.४१ करोड रुपयांची कमाई झालीं असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

मध्य रेलवे विस्टाडोम कोच ला सर्वात जास्त पसंती दिली काचेचे पारदर्शक डबे यामुळे निसर्गाचा अदभूत नजारा यातून पाहता येणे शक्य असल्याने प्रवाशांकडून या कोच ला जास्त मागणी करत यातून प्रवास केला यामुळे ८.४१ करोड इतके उत्पन्न प्राप्त झाले या बाबत नुकतेच मध्य रेल्वे ने आकडे वारी जाहीर केली त्या मध्ये व्हिस्टाडोम कोच आघाडीवर राहिले आहे रोमांच कारी प्रवास असलेल्या मुंबई-मडगाँव जनशताब्दी एक्सप्रेस ने 100% टक्क्यांहुन अधिक प्रवाशांनी या गाडीला पसंती दिली या मधून ८२५६ प्रवाशांनी प्रवास केला या गाडी च्या माध्यमातून १. ७१ कोटीं ची कमाई केली

पुणे-मुंबई प्रगति एक्सप्रेस ने ६.९६ करोड़ रुपये तर मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस ने १ १८ करोड़ रुपये कमावले

विस्टाडोम कोच ला वाढती मागणी

“विस्टाडोम कोच पहिल्यांदा २०१८ मध्ये मुंबई-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये लावण्यात आले होते मात्र प्रवाशांची वाढती मागणी मुळे मुंबई-मडगांव मार्गावर दूसरा विस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ ला तेजस एक्सप्रेस मध्ये जोडले गेले होते

काचेचे पारदर्शक छत , आकर्षक वैशिष्ट्य ने परिपूर्ण असलेल्या कोच मध्ये मोठ्या खिडक्या एलईडी लाइट्स, रोटेटेबल सीट आणि पुशबैक चेयर, विजेवर चालणारे स्वचालित स्लाइडिंग कम्पार्टमेंट दरवाजे, विकलांग प्रवाशां साठी मोठे साइड स्लाइडिंग दरवाजे और सिरेमिक टाइल चे शौचालय ,तसेच बाहेरील निसर्ग पाहण्यासाठी बनवण्यात आलेली गैलरी या मुळे या कोच मधील प्रवास अविस्मरणीय ठरत आहे