ओटवणे (प्रतिनिधी ) स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये इयत्ता पाचवीला शिकणाऱ्या कु.भुवन पुंडलिक दळवी या विध्यार्थाने विझ इंटरनॅशनल स्पेल बी या राज्य स्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून त्यांनी या कठीण परीक्षेत राज्यात दुसरा येण्याचा मान पटकवीला.लहान पणा पासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या भुवनला शब्दांची प्रचंड आवड आहे नवीन नवीन शब्द शिकण्यात त्याला मोठी गोडी असल्याने तसेच कोणतीही गोष्ट तो सहज लक्षात ठेवतो त्यामुळेच एखाद्या शब्दाच स्पेलिंग त्याच्या सहज लक्षात राहते. या सर्व गोष्टीमुळे आणि त्याच्या हुशार पणामुळे त्याला या परीक्षेसाठी आई वडिलांबरोबर शिक्षक वृंदानीही विशेश मार्गदर्शन केले. त्यामुळे आपल्या या यशाच श्रेय ही तो आपल्या आई वडिलांबरोबर शिक्षक वृंदाना देतो.त्याला मोठं होऊन खूप लेखन करायचं आहे लेखक बनायच आहे त्याने राज्यात मिळविलेल्या यशा मुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे आणि इथही तो आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवेलअसा शिक्षक वृंदाना विश्वास आहे.अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत राज्य स्तरावर मिळविलेल्या यशानंतर आता राष्ट्रीय पातळीवर आपल्या गुणवत्तेची छाप सोडणार आहे. त्याच्या या यशाबद्दल स्टेपीन स्टोन ग्लोबल ग्लोबल स्कूल चे अध्यक्ष रुजूल पाटणकर आणि शिक्षक वृंदानी अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्यात.त्याचे वडील पुंडलिक दळवी यांनी ही अभिनंदन करताना आपल्या मुलाच्या गुणवत्ते ला योग्य प्रकारे ज्ञाय देत मार्गदर्शन केल्याबद्दल स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी चे विषेश आभार मानले.












