दापोली l प्रतिनिधी:- २५ वे रौप्य महोत्सवानिमित्त सरकार मान्य रास्त दराचे चालक-मालक संघटना दापोली, संलग्न रत्नागिरी जिल्हास्तरीय कार्यक्रम श्री शैल सभागृह जालगाव येथे संपन्न झाला.
२५ वे रौप्य महोत्सवानिमित्त नामदार योगेश दादा कदम ( राज्य मंत्री गृह, महसूल विकास व पंचायती राज, अन्न व नागरीपुरवठा व ग्राहक पंचायत राज आणि अन्न व औषध प्रशासन विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास संपूर्ण जिल्हाभरातून सरकार मान्य रास्त दराचे चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष कदम, जिल्हा संघटन सचिव नितीन कांबळे, खजिनदार रमेश राणे, सदस्य शशिकांत दळवी, अनंत केंद्रे, संतोष उतेकर, महेश नकाशे, दिलीप राणे, महेश साबळे, विजय राऊत, प्रदीप मालुसरे, बाळकृष्ण ओक तसेच दापोली तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष दिलीप राणे, दापोली तालुका उपाध्यक्ष सुधाकर मोरे, तालुका सचिव समीर मंडलिक, रत्नागिरी जिल्हा संघटना सदस्य महेश साबळे, सदानंद श्रीवर्धनकर, महिला प्रतिनिधी अश्विनी शेवडे, रेश्मा नेवरेकर, शिल्पा राजे, रेवती देरदेकर व इतर सदस्य चालक-मालक आपल्या परिवारासह उपस्थित होते.
६५ वर्षावरील सरकार मान्य रास्त दराचे चालक-मालक सभासद धनंजय जोशी, मोहन सेठ यांचा सत्कार नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोरोना कालावधीत तहसीलदार कार्यालयीन कर्मचारी श्रीमती शिगवण यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार नामदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा अध्यक्ष अशोक कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात आपल्या समस्या मांडताना “जे धान्य विक्री होते त्याचे कमिशन धान्य दुकानदाराला आठ आठ महिने मिळत नाहीत. त्यामुळेच एकद्या धान्य दुकानदाराला जोड धंदा करण्याची गरज लागते. ही व्यथा व्यक्त केली. त्यामुळे जेवढे धान्य विक्री होईल त्याचे कमिशन त्याच किंवा पुढील महिन्यातच आमच्या खात्यात जमा व्हावे.
तसेच २०१४ जे आमचे कमिशन ठरविण्यात आले तेच कमिशन आम्हाला ११ वर्षानंतरही तेवढेच कमिशन मिळते आहे. त्यामुळेच महागाईची वाढती झळ पहाता आजच्या मिळणा-या कमिशन मध्ये वाढ व्हावी.या विषयांवर नामदार योगेश कदम यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच जे धान्य विक्री होते त्याचे कमिशन मी त्याच महिन्यात मिळण्याच्या सुचना आजच देतो. तसेच जिओ आणि बी.एस.एन.एल या कंपन्यांना सुचना देतो. असे आश्वासन दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाळसुरे विद्यालयातील मुख्याध्यापक संदेश राऊत यांनी केले.









