दापोली | प्रतिनिधी:– माझी वसुंधरा अभियान 5.0 चा निकाल जाहीर झाला असून ग्रामपंचायत विरसईने पुन्हा कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशामध्ये सरपंच सौ. मनोरमा राणे, उपसरपंच आयु. विद्यार्थी जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री विरेश कदम, मार्गदर्शक श्री दिनेश राणे, ग्रामपंचायत सदस्य-सदस्या व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच विरसई जनसेवा मंडळ (मुंबई/ग्रामीण) चे सर्व पदाधिकारी, विरसई जनसेवा महिला मंडळ चे पदाधिकारी, विरेश्वर विद्यालय विरसई येथील विद्यार्थी-शिक्षक व कर्मचारीवर्ग, जि.प. आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थी – शिक्षक, अंगणवाडी सेविका – मदतनीस तसेच आदर्श गाव विरसईतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांचे हे एकत्रित यश आहे.










