शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील विवाहिता बेपत्ता

 

देवगड : प्रतिनिधी

शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ.रोशनी राकेश निकम(२०) ही विवाहीत महिला दि. १८ ए्िरपल रोजी बेपत्ता झाली आहे.याबाबतची तक्रार तिचा पती राकेश सुनिल निकम(२८) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ.रोशनी निकम पतीसमवेत शिरगाव आंबेखोलवाडी येथे राहत असून ही १८ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वा.सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली तिचा शोधाशोध करूनही सापडली नाही.ती बेपत्ता झाल्याची तक्रार पती राकेश निकम यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.याबाबतचा तपास पो.हवालदार महेंद्र महाडिक हे करीत आहेत.