दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आपल्या अष्टपैलू राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीने जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवणारे बोडदे येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री. रमेश अर्जुन दळवी (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने बोडदे परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे
एका कणखर नेतृत्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजकीय व सामाजिक प्रवास
रमेश दळवी यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि प्रेरणादायी होता. त्यांनी सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर
राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. त्यांनी चांगले यश संपादन केले होते
माजी सैनिक पतसंस्थाअध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले. तसेच सहकार क्षेत्रात भरीव काम केले होते
भाजपाचे जिल्हा खजिनदार म्हणून काम केले होते.
तालुक्यातील राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा
खासदार नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून रमेश दळवी यांची जिल्ह्यात ओळख होती. राणे यांच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांत आणि पक्षकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले होते
रमेश दळवी यांच्या निधनाची बातमी समजताच सकाळपासूनच त्यांच्या बोडदे येथील निवासस्थानी राजकीय पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि चाहत्यांची मोठी रीघ लागली होती. विशेषतः माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे













