पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये नातेवाईक असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

दि. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम, जम्मू आणि काश्मीर येथे एका पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सदर ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी व्यक्ती उपस्थित असल्यास, अथवा आपल्या ओळखीतील किंवा नातेवाईकांपैकी कोणी तिथे गेले असल्याची माहिती असल्यास, कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, ही नम्र विनंती आहे.

 

या संदर्भात संपर्क करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228847 आणि मोबाईल क्रमांक 7498067835 असे आहेत.

 

या घटनेनंतर पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत राहणारा हेल्प डेस्क अथवा आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

 

सदर नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 0194-2483651 आणि 0194-2457543 असून, WhatsApp वर संपर्क करण्यासाठी 7780805144 आणि 7780938397 हे क्रमांक उपलब्ध आहेत.