परुळे : प्रतिनिधी : स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत राज्य व केंद्र स्तरावर नामांकन साठी परुळेबाजार ग्रामपंचायत ला राज्यस्तरीय समितीने आज भेट दिली. यावेळी सविस्तर माहिती घेऊन समितीने तपासणी केली.
यावेळी समिती मध्ये जिल्हा स्वच्छता कक्ष कोल्हापूर चे विलास पाटिल, संतोष घारगे, विकास पाटिल यांच्यासह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे निलेश मठकर, संतोष पाटिल, प्रविण कामतेकर आदी उपस्थित होते. समितीचे ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निवडी करीता ऑनलाईन प्रणाली व स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत साडपाणी,घनकचरा व्यवस्थापन व हागणदारी मुक्त आदी विषयावर ऑनलाईन २०० गुणांची प्रश्नावली ऑनलाईन प्रणालीवर तयार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने समितीने पाहणी केली.
वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत ने आतापर्यंत विविध अभियानात सहभागी होऊन केंद्र व राज्य स्तरावर बक्षीस मिळालेली आहेत. त्यामुळे आता या स्वछ सर्वेक्षण २०२३ मधेही चांगले काम करून मानांकन मिळवण्यासाठी परुळेबाजार गाव सज्ज झाला आहे. त्या दृष्टीने काम करीत आहे. आज सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, प्राजक्ता पाटकर, पूनम परुळेकर, नमिता परुळेकर, सीमा सावंत, तन्वी दूधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे यांच्यासह माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचारी, आशा, शिक्षक, सीआरपी यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समितीने शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छता या अनुषंगाने पाहणी केली व माहिती घेतली. तसेच काथ्या प्रकल्पाला भेट दिली. एकूण पाहाणी नंतर समितीने कामाबाबत समाधान व्यक्त केले.