खेड मधील सवेणी-धनगरवाडीचा टँकरच्या पाण्यासाठी अर्ज

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील सवेणी-धनगरवाडी येथेही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. टँकरच्या प्रतीक्षेत असलेल्या गाव-वाड्यांची संख्या ५ झाली असून अजूनही केवळ दोन गावातील वाड्यांमध्येच पाण्याचा टैंकर धावत आहे.
वावे-ढेबेवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, चिरणी-धनगरवाडी, गुणदे-काळकाईवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. रणरणत्या उन्हामुळे उपलब्ध जलस्त्रोत अटत असून ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू घेरारसाळगड-बुधराईवाडी, आहे. खवटी-खालची धनगरवाडी या दोन वाड्यांमध्येच पाण्याचा टैंकर धावत असून उर्वरित गाव-वाड्यातील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.