पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवून जाळला ; पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा मालवणात व्यक्त झाला तीव्र संताप
अमित खोत | मालवण : मुर्दाबाद, मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद…. अशी पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पायदळी तुडवून जाळण्यात आला. मालवणात भरड नाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यानी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेध नोंदवत पाकिस्तान विरोधातील संताप आपल्या तीव्र भावनातून व्यक्त केला.
दरम्यान, काश्मीर येथील हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकिस्तान ध्वज पायाखाली ठेवून भारताचा राष्ट्रध्वज व भगवा झेंडा फडकवत जय श्री राम, भारत माता की जय…. छत्रपती शिवाजी महाराज की जय… यांसह अनेक घोषणा देत उपस्थित नागरिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल पदाधिकारी, पक्ष पदाधिकारी, मालवणातील हिंदु व मुस्लिम बांधव उपस्थित होते. यात विश्व हिंदु परिषद मालवण अध्यक्ष भाऊ सामंत यांसह विलास हडकर, ऍड. समीर गवाणकर, डॉ. पंकज दिघे, रत्नाकर कोळंबकर, बजरंग दल मालवण तालुका संयोजक श्रीराज बादेकर, सह संयोजक गणेश चव्हाण, बबन परुळेकर, सुदेश आचरेकर, महेश कांदळगांवकर, बाबा मोंडकर, आपा लुडबे, महेश मांजरेकर, बबलु राऊत, आबा हडकर, ललित चव्हाण, किसन मांजरेकर, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, पार्थ डिचवलकर, अन्वेषा आचरेकर, तनुजा चव्हाण, सौं. शिल्पा खोत, महिमा मयेकर, अमिता निव्हेकर, राणी पराडकर, स्मृती कांदळगांवकर, तुलसी चव्हाण, शांती तोंडवळकर, पूजा करलकर, अंजना सामंत, ऋत्विक सामंत, सिद्धेश मांजरेकर, परशुराम पाटकर, किशोर खानोलकर, अवी सामंत, मंदार आजगावकर, संदीप भोजने, नितेश पेडणेकर, दशरथ कवटकर यांसह हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव मुकादम व अन्य सहभागी झाले होते.
यावेळी विलास हडकर, ऍड. समीर गवाणकर, भाऊ सामंत यांनी आक्रमक शैलीत प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडले. दहशतवाद्यानी २७ निरपराध हिंदूंची धर्म विचारून गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. धर्मावर आधारित दहशत माजविणाऱ्या या क्रूर दहशतवाद्याना भारत सरकार कठोर शिक्षा देईलच. पापाचा घडा भरलेल्या पाकिस्तानला लक्षात राहील असेच प्रत्तूत्तर मिळेल. अश्या भावना मांडताना अतिशय तीव्र स्वरूपात संतापाचा सुर व्यक्त करण्यात आला.










