डॉ. श्रीपाद कशाळीकर यांचे निधन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर (८९, रा. माठेवाडा, सावंतवाडी ) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सालईवाडा येथील दवाखान्यात त्यांनी अनेक वर्षे सावंतवाडीकर नागरिकांना वैद्यकीय सेवा दिली होती. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच संगीत व साहित्य क्षेत्रातही त्यांचा वावर होता. त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी ६.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुबोधन कशाळीकर व मेडिकल व्यावसायिक मकरंद आणि अनिरुद्ध यांचे ते वडील होत.