राजापूर शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन

पहलगाव दहशतवादी हल्याचा केला निषेध

राजापूर (वार्ताहर): जम्मु काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्त सकल हिंदु समाजाच्या वतीने राजापूर जवाहरचौक येथे शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली तर यावेळी पाकिस्तानच्या झेंडयाचे दहन करीत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या.
राजापूर शहरातील समस्त हिंदू बांधवांनी यापूर्वी येथील तालुका प्रशासनाला निवेदन सादर करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. शनिवारी सायंकाळी पाच वाजता राजापूर शहरातील जवाहर चौकात समस्त हिंदू बांधव जमा झाले आणि त्यांनी पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हल्ला केला. त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्या हल्ला प्रकरणी पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने संतप्त हिंदू बांधवांनी जवाहर चौकात पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. आणि पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन केले. यावेळी हिंदु समाज बांधव उपस्थीत होते.
फोटो 26 आरजेपी 2।3
राजापूर जवाहरचौक येथे पाकिस्तानच्या झेंडयाचे दहन करताना हिंदु बांधव.तर दुसऱ्या छायाचित्रात निदर्शने करण्यासाठी जमलेले सकल हिंदु बांधव.