MALVAN: काळसे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Youth committed suicide by hanging in Kalse

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

चौके – प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील तरुण श्री. वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील ( वय ४५ ) या तरुणाने बुधवार दिनांक ३१ मे रोजी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाश्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. जी. मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आणि वामन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे नेण्यात आला.
कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला वामन पाटील हा काही दिवसांपुर्वी काळसे येथील आपल्या घरी आला होता. तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर अधिक तपास करत आहेत.