तळे मध्ये बांबुच्या काठीने वृद्धास मारहाण एकावर गुन्हा

खेड(प्रतिनिधी) घरात मद्य प्राशन करून येऊन राहते घरातील लाईट चे मेन स्वीच ऑफ करत रागाने शिविगाळी करत मेन स्विच ऑन चालु करण्यास गेले ल्या महिलेला मारहाण केल्याने त्याचा जाब विचारण्या साठी गेलेल्या ७५ वर्षीय वृद्धास बांबू च्या काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील तळे कासार वाडी येथे २५ रोजी रात्री ११.३० वाजता घडली

सुभाष कृष्णा ताम्हणकर ४५ असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे तर या मारहाणीत कृष्णा आत्माराम ताम्हणकर ७५ हे वृद्ध जखमी झाले आहेत
या मारहाणीत फिर्यादी कृष्णा ताम्हणकर यांची नात जानवी हिस सोडवण्यास आली असता तिलाही सुभाष याने शिवीगाळी करुन ढकलुन दिले दरम्यान मारहाणी त जखमी झालेले वृद्ध कृष्णा ताम्हणकर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली