देवसडे मध्ये दगडी चिरे चोरीस तिघांवर गुन्हा

खेड(प्रतिनिधी) बंगल्याच्या अंगणात ठेवलेले ३ हजार रुपये किंमती चे दगडी चिरे तिघांनी चोरून नेल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार देवसडे कदम वाडी येथे घडला

या प्रकरणी यज्ञश चंद्रकांत कदम रा देवसडे कदम वाडी सद्या राहणार वसई पालघर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बंगल्याच्या अंगणात ठेवलेले ३५ ते ४० चिरे तिघांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे