सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत संस्थेला 20 पदे भरण्याची मान्यता मिळाली असून खाली नमूद केलेल्या पदांचे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, लॅब असिस्टंट १० पदे, अकाउंट क्लर्क ०२ पदे, ज्युनिअर क्लर्क ०४ पदे, वर्कशॉप असिस्टंट ०४ पदे. सदर पदांसाठी आयटीआय ( फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन एसी मेकॅनिक), कोणत्याही शाखेचा डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनियर , किंवा इतर कोणत्याही शाखेचा पदवीधारक या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतो. प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिन्यांचा असून शासकीय नियमानुसार प्रशिक्षणार्थींना स्टायपेंड मिळणार आहे व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणीनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आह. अधिक माहितीसाठी
प्राध्यापक. एकनाथ मांजरेकर 9545890402
प्राचार्य. डॉ. डी एस बाडकर 9421816280 यांच्याशी संपर्क साधावा.










