शिरगांव ( प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथे अमली पदार्थ विरोधी प्रभात फेरी काढण्यात आली. अमली प्रदार्थ विशेष मोहीम अनुषंगाने हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी’ व्यसन करणे सोडा आरोग्याशी नाते जोडा, ‘तंबाखूचा घास जीवनाचा नास, अशा घोषणा देत साळशी येथे प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत या गावचे सरपंच वैशाली सुतार, पोलीस पाटील कामिनी नाईक, ऋतुजा घाडी, गीता पारधी, दिलीप गावकर, विजय लाड, विलास गावकर, बंडू मिराशी आदी ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते.












