हातखंबा-बोंबलेवाडी गिरदा येथे सापडला अज्ञात प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील हातखंबा-बोंबलेवाडी गिरदा येथे बुधवार 7 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास अज्ञात प्रौढाचा मृतदेह सापडून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत तेथील पोलिस पाटलांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, हातखंबा येथील गणपत डांगे यांनी पोलिस पाटलांना हातखंबा येथील बोंबलेवाडी गिरदा या ठिकाणी एका अज्ञात प्रौढाचा मृतदेह सापडून आल्याची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. या प्रौढाचा 4 ते 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.