इन्सुली चेकपोस्टवर २४ लाखांची दारू जप्त 

इन्सुली एक्साईज विभागाची कारवाई 

बांदा l प्रतिनिधी :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूचे मोठे घबाड पकडण्यात यश आले आहे. बेकायदा गोवा बनावटीच्या वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने कारवाई केली. या कारवाईत २३ लाख ९७ हजार रुपयांच्या दारूसह एकूण ३९ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासणी सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन चालक पसार होण्यात यशस्वी झाला. या कारवाईत मॅकडोवेल व्हिस्कीचे तब्बल २३५ बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पो (एमएच १८ बीजी ७०२२) ताब्यात घेण्यात आला.

 

ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान दीपक वायदंडे, अभिषेक खत्री, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.