हातीव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणे कामाचा भूमिपूजन सोहळा व हातीव प्राथमिक उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मत्स्य व बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे यांच्याहस्ते संपन्न

देवरूख (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील निर्मल व स्मार्ट ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधणे कामाचा भूमिपूजन सोहळा व प्राथमिक आरोग्य केंद्र निवेखुर्द अंतर्गत उपकेंद्र हातीवच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री श्री. नितेश राणे यांच्याहस्ते शुक्रवारी संपन्न झाला.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले कि, हातीव गावातील ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले असून लवकरच इमारत उभी राहून या नवीन इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार हाकला जाईल. असे सांगितले. तर प्राथमिक उपकेंद्राच्या माध्यमातून हातीव गावातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा आता गावातच मिळतील. त्यांना दुसरीकडे जावे लागणार नाही, असे म्हटले. या दोन्ही कार्यक्रमप्रसंगी आमदार श्री. शेखर निकम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, भाजपचे प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, हातीवचे सरपंच नंदकुमार कदम, गटविकास अधिकारी भरत चौगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे, निवेखुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोहिरे विविध विभागातील सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, ग्रामस्थ उपस्थित होते.