पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय
प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.करवीर निवासनी श्री.अंबाबाई मंदिरात येताना काही नियम व अटी पश्चिम देवस्थान समितीने घातल्या आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येताना काही धार्मिक पावित्र्य असणं अत्यंत आवश्यक्य आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. अनेक भाविक हे तोकड्या कपड्यात मंदिरात येतात त्यामुळे मंदिराचे एकूण धार्मिक पावित्र्य अनेकदा नष्ट होते. त्यामुळे आता तोकड्या कपड्यात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पारंपरिक पद्धतीचे व्यवस्थित कपडे मंदिरात घालून यावे असा निर्णय पश्चिम देवस्थान समितीने घेतला आहे. पारंपरिक पद्धतीची कपडे घालून धार्मिक भावना जपली जाईल अशाच कपड्यांमध्ये भाविकांनी मंदिरात यावे यासंदर्भातला निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
याबाबत प्रसिध्दी पत्रक जाहीर करत भाविकांना सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे











