तोंडवळी फाटा ते तळाशील रस्ता काम पूर्ण ; तोंडवळी तळाशील वासियांनी मानले आभार…
मालवण | प्रतिनिधी : तोंडवळी फाटा ते तळाशील हा खड्डेमय झालेला रस्ता 15 मे पूर्वी डांबरीकरण करून दिला जाईल हा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महिना भरापूर्वी ग्रामस्थांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याबाबत तोंडवळी – तळाशील वासियांनी समाधान व्यक्त करतं आभार मानले आहेत.
तोंडवळी फाटा ते तळाशील या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना शब्द देताना सांगितले, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. रस्ता प्रश्न सोडवून १५ मे पूर्वी रस्त्याचे काम मी मार्गी लावून देईन. असा शब्द दिला होता. त्यानुसार या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी श्री. सामंत यांचा सत्कार करत आभार मानले.
आगामी काळातही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी व जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जयप्रकाश परुळेकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, माजी नगरसेवक दीपक पाटकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, मंदार लुडबे, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, सदस्य भूपाल मालंडकर, अनन्या पाटील, सुजाता पाटील, गणेश तोंडवळकर, संजय तारी, श्रीकृष्ण रेवंडकर, विश्वनाथ खवणेकर, विजय पाटील, कल्पेश नाईक, संजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











