(TDS on Interest / Salary / Remuneration to Partners)
सीए जयंती कुळकर्णी कुडाळ
आयकर कायद्यात नवीन आलेल्या कलम 194 T नुसार आर्थिक वर्ष 2025-2026 पासून भागीदारी फर्मने भागीदारांना द्यावयाच्या व्याज/ मेहनताना /पगार इ. रकमांवर आयकराची करकपात (TDS) करणे आवश्यक आहे.
यासंबंधी मुख्य तरतुदी खालीलप्रमाणे
1. सदर करकपात भागीदारी संस्थेने करावयाची आहे.
याकरिता भागीदारी संस्थेकडे करकपात खाते क्रमांक (Tax Deduction Account Number म्हणजे TAN) असणे
आवश्यक आहे. TAN क्रमांक आतापर्यंत काढलेला नसेल तर त्यासाठी योग्य तो अर्ज करून सदर क्रमांक काढून घ्यावा.
2. ज्या भागीदाराला व्याज /पगार /मेहनताना इ. मिळणाऱ्या रकमेवर 20,000 पेक्षा जास्त असतील अशाच भागीदाराच्या बाबतीत सदर करकपात करणे आवश्यक आहे. सदर करकपात 10 % या दराने करावयाची आहे.
उदाहरणार्थ – एका भागीदारी फर्म मध्ये चार
भागीदार असून त्यांच्या खात्यावर खालीलप्रमाणे व्याज व पगार जमा करण्यात आला आहे. यावर करावयाची करकपात (TDS) शेवटच्या स्तंभात (Column) नमूद केली आहे.
भागीदाराचे नाव/ भांडवलावरील व्याज वपगार
एकूण / करकपातीचा दर/ एकूण कर कपात
ABC 15,000 2,000 17,000 —- —-
EFG 25,000 45,000,70,000 10% 7,000
PQR 4,000 60,000 64,000 10 % 6,400
XYZ 16,000 18,000 34,000 10 % 3,400
3. सदर करकपात व्याज /पगार/ मेहनताना इ.
भागीदाराच्या खात्यावर जमा (Credit) करताना किंवा सदर रक्कम अदा (Payment) करताना करावयाची आहे.
सामान्यतः भागीदाराला मिळणारे व्याज आणि पगार त्याच्या खात्यावर वर्षअखेरीस जमा केला जात असल्याने सदर करकपात 31 मार्च 2026 रोजी करणे आवश्यक आहे.
4. मार्च महिन्यात केलेल्या करकपातीचा (TDS) भरणा 30 एप्रिल पर्यंत करणे आवश्यक आहे. इतर महिन्यात केलेल्या
करकपातीचा (TDS) भरणा पुढील महिन्याच्या 7 तारीख पर्यंत करणे आवश्यक आहे.
5. कपात केलेया कराचा (TDS) भरणा उशिरा केल्यास कपातीच्या महिन्यापासून भरणा करेपर्यंत दरमहा 1.5% व्याज द्यावे लागेल.
6. सदर करकपातीचे तिमाही विवरण (Quarterly TDS statement) फॉम 26Q मध्ये भरणे आवश्यक आहे. सदर तिमाही विवरण पत्र विलंबाने दाखल केल्यास प्रतिदिन
200 (दोनशे रुपये) इतके विलंब शुल्क
द्यावे लागते.
7. सदर तिमाही विवरणपत्र दाखल केल्यानंतर
प्रत्येक भागीदाराला TDS च्या संकेतस्थळावरुन (TRACES Portal) डाउनलोड केलेले Form 16A या नमुन्यातील
प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
8. वरीलप्रमाणे करकपात करुन कराचा भरणा न केल्यास सदर व्याज आणि पगार वगैरे रकमां
च्या 30% इतकी रक्कम भागीदारी फर्मचा खर्च म्हणून नामंजूर केली जाईल. आणि यावर भागीदारी फर्मला आयकर भरावा लागेल.
प्रत्यक्ष कार्यवाही करताना घ्यावयाची काळजी
1. प्रत्येक भागीदाराचा पॅन क्रमांक त्याच्या आधार क्रमांकाला संलग्न असणे आवश्यक आहे. अन्यथा वाढीव दराने करकपात करावी लागेल.
2. सामान्यतः 31 मार्च रोजी व्याज आणि पगार भागीदाराच्या खात्यावर जमा केला जात असल्याने त्याच्या 10% इतकी कर कपात करुन 30 एप्रिल च्या आत त्याचा भरणा करणे आवश्यक आहे.
3. सामान्यतः भांडवलावरील व्याजाची रक्कम निश्चित करणे शक्य असते, परंतु भागीदाराला मिळणारा पगार हा पुस्तकी नफ्यावर (Book Profit) अवलंबून असतो. पुस्तकी नफ्याची
रक्कम भागीदारी फर्मचे हिशेब पूर्ण झाल्यानंतर निश्चित होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात हिशेब पूर्ण न झाल्यास मागील वर्षाच्या पगाराची रक्कम आधारभूत मानून यानुसार अंदाजे पगार ठरवावा. आणि करकपात करावी. 30 एप्रिलच्या आत
विहित मुदतीत करभरणा करावा. आणि 31 मे
या आत विहीत मुदतीत करकपातीचे विवरणपत्र दाखल करावे.
4. भागीदारी फर्मचे हिशोब पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती विवरण पत्र दाखल करता येईल.प्रत्यक्ष पगार कमी झाल्यास जास्तीचा करभरणा (TDS) भागीदारास परतावा (Refund)
मागता येईल. परंतु प्रत्यक्ष पगार जास्त झाल्यास वाढीव रकमेवर करभरणा करावा लागेल व त्यावर मार्च पासून भरणा करेपर्यंत दरमहा 1.5 % दराने व्याज द्यावे लागेल याची नोंद घ्यावी.
हा लेख माहितीसाठी असून याविषयी कर भरणा करताना प्रत्येकाने आपल्या सीए किंवा करसल्लागारांचा सल्ला घ्यावा.













