जिजाऊ ब्रिगेडच्याव तीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

चिपळूण (प्रतिनिधी) : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दि. १४ मे रोजी सकाळी अकरा वाजता शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण, तालुकाध्यक्षा मीनल गुरव, तालुका संघटक पुर्वा तांदळे, सामाजिक कार्यकर्त्यां रविना गुजर, नेहा जाधव, करिष्मा सावंत देसाई, थोर विचारवंत व लेखक, मुस्लिम ब्रिगेडचे मुदसर सय्यद, राकेश सावंत, राजेश कदम, राजेश सावंत देसाई, कॉग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, जाधव, इत्यादी शंभूप्रेमी उपस्थित होते. सुरुवातीस दीपप्रज्वलन करून शंभूराज्याच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. नंतर जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा मीनल गुरव यांनी शंभूराज्यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार मांडले. त्यानंतर प्रमुख वक्ते मुदसर सय्यद यांनी आपल्या अभ्यासू वाणीतून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अमोघ वाणीतून सांगितला. त्यानंतर कॉंग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी जगातील सर्वात शक्तीमान व पराक्रमी राजे छत्रपती संभाजी महाराज्याच्या जीवनातील अनेक प्रसंग विषद केले.