खेड. (प्रतिनिधी)खेड तालुक्यातील कुडोशी गावच्या हद्दीत मालवाहू टेम्पोने एक्टिवा दुचाकी हिला जोरात धडक दिल्याने झालेल्यां अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी ५ वा. दरम्यान झाला
योगेश मनोहर मोहिते (वय ४५), राहणार देवघर बौद्धवाडी असे जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे
दुचाकीस्वार खेडहुन देवघर येथे आपल्या एक्टिवा क्र.. एमएच १४ जेएफ ८९२७ घेऊन जात असताना मालवाहतूक करणारा मॅक्झिमो टेम्पो यांने समोरासमोर जोरदार धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम २४ तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबनी येथे दाखल करण्यात आले आहे.










