चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात प्रिन्स बोडवे, तर कुमार गटात सिध्दवेद कुलकर्णी व विघ्नेश सावंत प्रथम

संगीत खुर्ची स्पर्धेत निकिता रावले विजयी ठरल्या

सुखशांती मंडळचा स्तुप उपकम

शिरगाव, (प्रतिनिधी ):देवगड तालुक्यातील साळशी- सरमळेवाडी येथे घेण्यात आलेल्या चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धेत प्रिन्स बोडवे व सिध्दवेद कुलकर्णी व विघ्नेश सावंत यानी प्रथम क्रमांक पटकावला.

सुख शांती मंडळ साळशी- सरमळेवाडी व ग्रामस्थांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजे निमित्ताने ‘मुक्तांगण’ या लहान मुलांच्या कार्यक्रमांतर्गत चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी स्पर्धकांनी आपली कला सादर करत उत्कृष्ट कामगिरी केली.

चित्रकला स्पर्धेत बालगटात प्रिन्स बोडवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच या गटात तस्मी लाडगावकर व उर्वी रावले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर तृतीय क्रमांक समर्थ रासम याने मिळवला. कुमार गटात विघ्नेश सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला, प्रिन्स बोडवे द्वितीय क्रमांक, तर प्राजक्ता लोके यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत बाल गटात प्रिन्स बोडवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, मुक्ती लाडगावकर यांनी द्वितीय क्रमांक तर मुक्ती ताडगावकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. कुमार गटात हस्ताक्षर स्पर्धेत सिद्धवेत कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, विनित रावले यांनी द्वितीय क्रमांक आणि वैष्णवी शिंदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

महिलांसाठी आयोजित संगीत खुर्ची स्पर्धेत निकिता रावले यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर मीनाक्षी लाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. बालगटातील संगीत खुर्ची स्पर्धेत स्वयम रावले यांनी तसेच कुमार गटात विघ्नेश सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

या सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास सुख शांती मंडळाचे सर्व पदाधिकारी, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देण्याचा हा मडळाचा स्तुप्त उपकम असल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.