वाकवली येथे वीज पडल्याने गोठा जळून खाक

शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखांचे नुकसान*

दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील वाकवली येथील गोठ्यात वीज पडल्याने गोठा जळुन खाक झाला आहे. सुदैवाने यातील ५ गुरांना वाचविण्यात यश आले आहे. सदरची घटना २० मे रोजी दुपारी ४.१५ वाजता दरम्यान ही घटना घडली. यात शेती उपयोगी वस्तू व जनावरांचा चारा जळून खाक झाला. यात शेतक-याचे सुमारे दोन लाख सत्त्याहत्तर हजार सातशे पन्नास लाखांचे नुकसान झाले.

 

आज दुपारी झालेल्या तालुक्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाकवली येथील शेतकरी शरद विठोबा जंगम यांचे वाकवली येथील गोठ्यावर वीज पडल्याने गोठा जळून खाक झाला. ज्यात शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले.

 

गोठा जळल्याची माहिती शेतकऱ्याने ही माहिती तहसील कार्यालयास दिली. तलाठी, पोलीस पाटील- सुहासिनी भुतकर, राजेंद्र तांबे-उपसरपंच वाकवली, विनोद जाधव तंटामुक्ती अध्यक्ष, प्रकाश जाधव, सुर्यकांत जाधव या पंचासह घटनास्थळी पोहचले. पंचनामा केला असता त्यात शेतक-यांचे चिरकाम लाकडे, कौलारु कोने, वासे, लाकडी दरवाजे, रीप, कोन वासे, कौले, पेंढा, भाले, सुका गवत, लाकडी नांगर आदी शेती साहित्य असे एकूण दोन लाख सत्त्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.