खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मेटे येथील असगणी मोहल्ल्यात ११ मे रोजी दुपारी सुमारास घरात घुसून एका कुटुंबावर तिघा आरोपींनी केलेल्या हल्ल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शमशुद्दीन सत्तार बोट (४५) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शोएब अख्तर यांच्यासह ईरफान शोएब अख्तर व
कामील शोएब यांनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत घरातील महिला व मुलीवर हल्ला केला. शमशुद्दीन यांची मुलगी भांडणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना ईरफान याने घरात घुसून मोबाईल बंद कर, नाहीतर तुला खल्लास करतो अशी धमकी दिली. शोएब ने शमशुद्दीनच्या आईला जमिनीवर ढकलले व त्यांच्या मुलीवर लाथाबुक्क्यांनी हल्ला करत, डोळा व डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली.












