रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलामार्फत पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीमधील राहणार्या सर्व 13 बांग्लादेशी नागरिकांचे “प्रत्यार्पण” करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबेर 2024 रोजी एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी 13 बांग्लादेशी नागरिक मिळून आले होते. त्यामध्ये,
1) वाहिद रियाज सरदार
2) रिजऊल हुसेन कारीकर
3) शरिफुल हौजिअर सरदार
4) फारूख महमंद जहिरली मुल्ला
5) हमीद मुसाफा मुल्ला
6) राजु अहमंद हजरतअली शेख
7) बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार
8) सैदूर रेहमान मुबारक अली
9) आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल
10) मोहम्मद शाहेन समद सरदार
11) मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली
12) मोहम्मद नुरहसन जहर सरदार
13) मोहम्मद लालतू मोंदल किताब अली
या सर्वांकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली होती. याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला व या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला व मुदतीमद्धे या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले होते.
याच प्रकरणाची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी सर्व 13 आरोपींना प्रत्येकी 06 महीने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व 13 दोषी बांग्लादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली व या सर्व बांग्लादेशी नागरिकांना दिनांक २० मे २०२५ रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आलेले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा तथा प्रभारी अधिकारी जि.वि.शा नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील नमूद पथकतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.
1) पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, सुरक्षा शाखा, रत्नागिरी,
2) स.पो.नि, श्री. रत्नदीप साळोखे, पूर्णगड पोलीस ठाणे,
3) पो.उनि, श्री. योगेश खोंडे, नियंत्रण कक्ष, रत्नागिरी,
4) पोलीस हवालदार श्री. संतोष कोळेकर,
5) पोलीस हवालदार श्री. संतोष करळकर,
6) पोलीस हवालदार श्री. प्रवीण पाटील,
7) पोलीस हवालदार नितीन डोळस,
8) पोलीस शिपाई दत्तात्रय शिंगारे,
9) पोलीस शिपाई अभय गायकवाड,
10) पोलीस शिपाई प्रवीण चौगुले,
11) पोलीस शिपाई संहिल गाडेकर,
12) पोलीस शिपाई जितेंद्र लाहानगे,
13) पोलीस शिपाई सूरज पन्हाळकर.












