आंबवलीत गरजू कुटुंबियांना मदतीचा हात

खेड(प्रतिनिधी)आंबवली येथील अपघाती निधन झालेल्या संतोष आखाडे यांच्या कुटुंबियांना मुलांच्या शिक्षणासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष विजय उर्फ बाबू चिखले यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे माजी नगराध्यक्ष विजय चिखले यांच्या कुटुंबियांकडून सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, बाबू चिखले यांचे चिरंजीव आदित्य चिखले, भाऊ लाड, आदेश चिखले आदी उपस्थित होते.